पिंपळदर गावाची माहिती

पिंपळदर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील बागलाण (सटाणा) तालुक्यातील एक प्रगतशील व कृषीप्रधान असे गांव आहे. सटाणा पासून पश्चिमेला ५ किमी अंतरावर सटाणा कळवण रस्त्यावर राज्य महामार्ग क्र. १७ वर आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १५३६ आहे. गावात एकूण ३०१ कुटुंबे आहेत. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने सन २०२५ ह्या वर्षी मॉडेल स्कूल मध्ये सहभाग नोंदवला आहे. तसेच गावात 2 अंगणवाडी असून दोन्ही अंगणवाडी डिजिटल व CCTV च्या निगराणीत आहेत. व गावात सुद्धा CCTV कॅमेरे बसविलेले आहेत.

 
पिंपळदर गावाला पिंपळदर हे नाव दरीमध्ये (डोंगरामध्ये) वसलेले व त्यात पिंपळाचे झाडे जास्त प्रमाणात असल्यामुळे पिंपळदर हे नाव पडले. गांव हे डोंगरापासून उतारावर असल्याने पावसाचे पाणी हे नाल्याने वाहून जात होते म्हणून गावाने शासनाच्या मदतीने सन १९७२/७३ मध्ये दगड्याचे धरण बांधले. त्याचप्रमाणे अजून दोन घरणे १९८० च्या आसपास गावात बांधण्यात आली. तसेच आजही गावात पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबविली जाते. गावाबा मुख्य व्यवसाय शेती असून शेतीमध्ये मुख्यतः कांदा, मका, बाजरी, भुईमुग, इ. पिके घेतली जातात, तसेच शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो. म्हैस, मेंढी, बकरी, कोंबडी या प्रकारचे व्यवसाय केले जातात.
 
पिंपळदर ते मुंजवाड रस्त्यावर गावापासून १ किमी अंतरावर खमताने शिवारात शनी मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १२ ते १५ वर्षापूर्वी आम्पातळ (डोंगर) जवळ केली गेली. छाठिकाणी वर्षातून एकदा ज्येष्ठ मध्ये शनी अमावस्येता यात्रा भरते. त्याचप्रमाणे गावापासून ३ किमी अंतरावर मांगबारी जवळ पिंपळदर खानखेडा रस्त्यावर नवश्या गणपतीचे जागृत देवस्थान आहे. तिथे दर महिन्याच्या चतुर्थीला कीर्तन, भजन, व महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला जातो. तसेच गावात गेल्या २५ वर्षापासून हरीनाम सप्ताह हा भरविला जातो. तसेच गावात एक गांव एक गणपती दरवर्षी नियमित बसतो.